दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलसाठी व स्थानकाच्या समश्यासाठी समाजसेवक अश्विनी केंद्रे व अमोल केंद्रे आक्रमक.
ठाणे, दिवा ता 21 मार्च : दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल सुरु करण्यासाठी आज दिव्यातील समाजसेवक अश्विनी केंद्रे व अमोल केंद्रे आक्रमक होऊन यलगार मोर्चा काढण्यात आला. तसेच दिवा रेल्वे स्थानकातील अनेक समश्या संदर्भात दिवा रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन मास्तर कमलेश कनोजिया यांना निवेदन देण्यात आले. दिव्यातील दातीवली रोड, विठ्ठल मंदिर ते दिवा पूर्व रेल्वे स्टेशन फाटक पर्यंत मोर्चा काढण्यात आला. दिवा रेल्वे स्थानकाचे उपस्टेशन मास्तर कमलेश कनौजिया यांनी दिवा येथून लवकरच लोकल सोडण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. सर्व जलद लोकल थांबण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. दिवा पूर्व रेल्वे तिकीट घर लवकरच चालू करण्यात येईल.आरक्षण खिडकीसह इतरही मागण्या रेल्वे प्रशासन अधिकारी लवकरात लवकर सोडवतील. 2 महिन्यात दखल घेवून समस्या न सोडल्यास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्य रेल्वे प्रबंधक कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल वेळ पडली तर रेल रोको आंदोलन करण्यात येईल. असे समाजसेवक अमोल धनराज केंद्रे सांगितले आहे.प्रसंगी रामपाल मौर्या यांच्यासह दिव्यातील अनेक दिवेकर महिला व रहिवाशी उपस्थित होते.