दिव्यातील पाणी समस्येची मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी घेतली गंभीर दखल.
ठाणे, दिवा ता 27 मार्च (संतोष पडवळ) : दिवा शहरातील म्हात्रे गेट प्रवेशद्वार येथील रहिवासी पाण्याच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागत असल्यामुळे याची गंभीर दखल घेत मा.उपमहापौर रमाकांत मढवी व उपविभाग प्रमुख चरणदास म्हात्रे यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता सुरेश वाघीरे यांच्यासह संबंधित विभागात दौरा करून पाण्याच्या समस्येचा प्रश्न सोडऊन लवकरात लवकर योग्य तो तोडगा काढा असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. प्रसंगी येत्या काही दिवसात सदर ठिकाणचा पाणीपुरवठा सुरळीत होईल असे पाणी उप अभियंता सुरेश वाघीरे यांनी आश्वासन दिले यामुळे राहिवसियानी सुटकेचा निःश्वास घेत मढवी यांचे आभार मानले. प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.