दिवा पश्चिम येथील पाणीप्रश्न सुटणार तरी कधी ; भाजपचे युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सतीश केळशीकर यांचे दिवा प्रभागसमितीचे सहायक आयुक्त यांना निवेदन
ठाणे, दिवा ता 27 मार्च (संतोष पडवळ) : दिवा पश्चिम विभागातील गेले अनेक वर्ष एन.आर. नगर, नागवाडी, क्रिश कॉलनी या विभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा लोक सहन करत आहेत. एन.आर. नगर, नागवाडी, क्रिश कॉलनी या भागातील पिण्याच्या प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठाणे शहर युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सतीश केळशीकर, ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य श्री. विजय अनंत भोईर, दिवा मंडळ सरचिटणीस श्री. समीर चव्हाण, ओबीसी मंडळ अध्यक्ष श्री. रोशन भगत, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर, मंडळ उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर गावडे व इतर कार्यकतें या सर्वानी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रीतम पाटील यांच्याशी गंभीर समस्यांबाबत चर्चा करून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी पत्रव्यवहाराद्वारे विनंती केली आणि श्री. प्रीतम पाटील यांनी पाणी समस्येसारखा गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.