मराठा वॉरियर्स कडून किल्ले भिवगड स्वच्छता मोहीम
रायगड ता 27 मार्च (संतोष पडवळ) : मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक मोहीम रविवार दि.२६.०३.२०२३ रोजी किल्ले भिवगड (रायगड) कर्जत येथे राबवण्यात आलेलि मोहीम नवीन पाण्याचे टाक खोदकाम करण्यास सुरुवात केली.
सदर मोहीम सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत , भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती गोरकामथ अध्यक्ष श्री. योगेश देशमुख तसेच श्री समाधान पाटील श्री. प्रमोद भोसले पाटील. देखील उपस्थित होते.
तसेच मराठा वॉरियर्स संस्थापक, अध्यक्ष .श्री.राहुल खैर
खजिनदार .श्री आकाश खैर. सल्लागार . स्वस्तिक गुरव . संघटक अक्षय मोहिते. उप सेक्रेटरी रोहित खैर. मीडिया प्रमुख अभिजीत गावडे. पदाधिकारी आणि 25 मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक उपस्थित होते ही मोहीम खूप उत्साहात पार पडली…