दिवा शहराजवळील खर्डी गावात ब्राईटन इंटरनॅशनल शाळेचे उदघाटन.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता 30 मार्च : रामनवमीच्या मुहूर्तावर अनेकांची मागणी असलेल्या दिवा शहराजवळील खर्डी गावात ब्राईटन इंटरनॅशनल शाळेचे उदघाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. सदर उदघाटना बरोबर नवीन शाळेत प्रवेश प्रक्रियाही सुरु झाली असल्याचे शाळेचे संचालक श्री. महाजन सर व श्री. राकेश सर यांनी सांगितले आहे. केजी ते इयत्ता 10 वी पर्यंत सी.बी.एस.सी. बोर्डचे शिक्षण दिले जाणार असून अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.
प्रसंगी ब्राईटन इंटरनॅशनल शाळेचे उदघाटन मा. नगरसेवक व उदयोजक श्री.बाबाजी पाटील व मा.नगरसेवक तुळशीराम चौधरी (अंबरनाथ) व उत्तरप्रदेश मध्ये शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख बनवणारे श्री.सुभाषचंद्र त्रिपाठी यांच्याहस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. सर व सर्व शिक्षकवृंद तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संपन्नता भगत व कु.मोहिनी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री.जय सर व कु.राहुल सर यांनी आभार मानून केली.