ठाण्याच्या ममता मसूरकर शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने सन्मानित.
मुंबई,दि.1एप्रिल 2023 (किशोर गावडे)
मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड पुणे ,दक्ष फाउंडेशन, महाराष्ट्र ,तसेच तेजस्विनी सामाजिक शैक्षणिक विकास संस्था – सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जय जय महाराष्ट्र माझा ,गर्जा महाराष्ट्र माझा आत्मनिर्भर लक्षवेध संमेलन पुणे येथे सायन्स पार्क हॉल येथे संपन्न झाला.
विविध अशा लक्ष केलेल्या क्षेत्रात कर्तव्यम सत्कार सोहळ्यात ठाणे कळवा येथील सौ.ममता मसूरकर रायझिंग स्टार शाळेच्या मुख्याध्यापिका यांचा शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका सौ. तृप्ती देसाई मराठी बिग बॉस फेम तसेच माननीय गिरीश प्रभुणे सुप्रसिद्ध समाजसेवक तथा पद्मश्री भारत सरकार हे उपस्थित होते .
ममता मसूरकर या कळवा परिसरात सातत्याने वैविध्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घेत आहेत. त्यांच्या सदर कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे.