गोपाळ धुरतचे मर्चंट नेव्ही परीक्षेत घवघवीत यश.
मुंबई,दि.1एप्रिल 2023 (किशोर गावडे )
“मर्चंट नेव्ही” मध्ये प्रशिक्षित तरुणांना एक नामी संधी मिळाली आहे. जहाजावरील आणि इंजिन विभागात नोकरीची उत्तम संधी प्राप्त होऊ शकते. देशातही आणि सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये तरुणांना मोठी संधी उपलब्ध झालेली असताना अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे मोरवे गावातील प्रगतिशील युवा उद्योजक दीपक धुरत यांचा ज्येष्ठ सुपुत्र गोपाळ धुरत यांने आपल्या अफाट जिद्दीने स्वकर्तृत्वाने “मर्चंट नेव्ही” चा सहा महिन्याचा कोर्स पूर्ण करून गोव्याच्या NUSI ॲकॅडमी मधून ऑनलाईन व प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये दिल्या. संपूर्ण देशातून चार हजाराहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मार्च 2023 मध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या विद्यार्थ्यांमधून गोपाळ धुरतने 39 वा क्रमांक प्राप्त केला.
गोपाळ धुरत यांने भांडुपच्या गुरुनानक हायस्कूलमध्ये इयत्ता केजी ते पाचवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून त्याने सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली ,येथे पूर्ण केले .
बारावीनंतर मर्चंट नेव्हीचा सहा महिन्याचा कोर्स त्याने पूर्ण केला. गोव्याच्या NUSI या अकॅडमीच्या माध्यमातून हा कोर्स पूर्ण केला. माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना गोपाळ धुरत यांने सांगितले की, मला देशाची सेवा करायची आहे. मर्चंट नेव्ही च्या माध्यमातून जे जे करता येईल ते मी निश्चित करून दाखवेन. शालेय शिक्षण घेत असताना मला या क्षेत्रात आवड निर्माण झाली. मर्चंट नेव्ही च्या माध्यमातून मी निश्चितच प्रगती करेन. कॅप्टन होण्याचे माझे स्वप्न आहे.आईबाबांना तसा मी शब्द दिला आहे.असा मला विश्वास आहे.
माझ्या या यशात आईवडिलांनी, सुजयकाका काकी, व शुभदा सनये (आत्या) यांनी मला खुप प्रेम, पाठबळ व आशीर्वाद दिलेत. शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच
कुटुंबातील सर्व सदस्यांचा सातत्याने पाठिंबा मिळाला म्हणून हे यश मिळाले.असेही गोपाळ धुरत यांनी बोलताना सांगितले. कला, क्रीडा, आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांनी गोपाळ धुरत चे फोन करून व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.