दिवा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष मोरेश्वर वारेकर यांचा 50 वा वाढदिवस उत्साहात साजरा
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 31 मार्च : दिवा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष मोरेश्वर वारेकर यांचा 50 वा वाढदिवस मोठया थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून दिवा शहर व्यापारी संघटनेत ते काम करत असून काल 50 व्या वाढदिवसाच औचित्य साधून दिवा शहरातील व्यापारी तसेच अनेक राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजासेवक, व्यावसायिक, उद्योजक व मित्र मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी दिवा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व व्यापारी तसेच शिवसेनेचे मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह इतर माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते तर भाजप व ठाकरे गटाचेही अनेक राजकीय पदाधिकारी तसेच उद्योजक उमेश पाटील, सुमित भोईर, कैलेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, नातेवाईकांच्या उपस्थित वाढदिवस साजरा करण्यात आला.