दिवा शहरास पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी.
ठाणे, दिवा ता 3 एप्रिल (संतोष पडवळ) – दिवा शहरातील वाढती लोक संख्या पाहता दिव्यात अनेक विकासकाम होत असताना रस्ते , उड्डाणपूल अश्या मोठ्या प्रकल्पची कामे प्रगती पथावर सुरु आहेत परंतु अद्याप पर्यंत प्रशासनाने त्यांना कोणत्याही थोर महापुरुषांची नाव दिले नाहीत याचीच दखल घेत दिव्यातील दलीत चळवळीतील समाजसेवक विकास इंगळे यांनी दिवा स्टेशन परिसरात काम सुरु असणाऱ्या व पूर्व- पश्चिमेस जोडणाऱ्या उडाणपुलास भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे असे निवेदन दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांस देण्यात आले.
प्रसंगी आपण दिलेल्या निवेदनाचा लवकरच विचार केला जाईल असे प्रभाग समितीतून स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे दिव्यातील बौद्ध समाजात आनंदाचे वातावरण असून येत्या 14 एप्रिल रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी होणार असताना यावर लवकरात लवकर निर्णय काढण्यात यावा असे इंगळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात समस्त बौद्ध धर्मीय समाजाच्या वतीने विनंती पूर्वक कळविले आहे.