दिवा मानपाडा रस्त्याचे डांबरीकरण जलद गतीने होणार – मा. उपमहापौर रमाकांत मढवी
ठाणे, दिवा ता 3 एप्रिल (संतोष पडवळ) : दिवा – मानपाडा रोडचे डांबरीकरण जलद गतीने पूर्ण होण्यासाठी दिवा शिवसेना तत्पर असून दिव्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यातील मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या अथक प्रयत्नाने आज अनेक रस्त्यांचे कामे जलद गतीने सुरू आहेत लवकरच सर्व रस्ते सुस्सज व खड्डे मुक्त होतील असे त्यांनी बोलताना स्पष्ट केलं तसेच दिवा मानपाडा रस्त्याची पाहणी करताना माननीय उपमहापौर व दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी, मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे, मा. नगरसेविका सुनीता गणेश मुंडे, उपशहरप्रमुख गणेश मुंडे, विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, अणि शाखाप्रमुख व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते