मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विक्रोळी पूर्व विभागात शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन…
मुंबई, दिं,3 (संतोष पडवळ) : ईशान्य मुंबईच्या विक्रोळी म्हाडा बिल्डिंग समोरील, टागोर नगर ग्रुप नंबर दोन, विक्रोळी पूर्व विभागात पहिल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व धर्मवीर आनंद दिघे सभागृहाचे शानदार उद्घाटन सोहळा रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले , शिवसेना सचिव संजय म्हशिलकर ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील, ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला .विक्रोळी पूर्व येथील शाखाप्रमुख संदीप खरात यांच्या शिवसेना शाखेचे उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिवसैनिक,अनिल अशोक पांधारे यांनी हायटेक लुक केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.सत्तांतरानंतर शिंदे गटाकडून स्वतंत्र कार्यालय उभी केली जात आहे. नाशिकनंतर आता विक्रोळी मध्ये दोन शिवसेना शाखांचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडून हायटेक लुक असलेले कार्यालय निर्माण करण्यात आले आहे.
अद्यावयात सुविधा असलेले हे कॉर्पोरेट लुकचे कार्यालय
व धर्मवीर आनंद दिघे सभागृह शिवसेना प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे.
यावेळी उपविभाग प्रमुख भाग्येश डोंगरे ,शाखाप्रमुख संदीप खरात ,भांडुप विधानसभा मतदारसंघातील व विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पुरुष आणि महिला सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाने संपर्क कार्यालय सुरू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.टागोर नगर ग्रुप नंबर 2 ,म्हाडा बिल्डिंग समोरील कार्यालयाच्या बाजूलाच धर्मवीर आनंद दिघे सभागृह साकारण्यात आले आहे.या कार्यालयामध्ये बैठक हॉल तयार करण्यात आला आहे. याशिवाय सोशल मीडियासाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे. कार्यालयातील स्टाफसाठी देखील व्यवस्था करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या काळात बैठका किंवा कार्यकर्त्यांच्या दृष्टीने विशेष आसन व्यवस्था करण्यात आली असून त्याचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. अशी माहिती अनिल पांधारे यांनी दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यालयाचे उद्घाटनानंतर हे जनतेच्या सेवेसाठी शिवसेना शाखा असणार असल्याचे देखील शाखाप्रमुख संदीप खरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.