दिव्यात हजारो महिलांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने महाआरती.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 9 एप्रिल : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते अयोध्येत शरयू नदी च्या तीरावर महा आरती चे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले असताना महाराष्ट्रात देखील तमाम शिवसैनिकांनी महाआरती केली तसेच दिव्यातील तमाम रहिवासीयांनी देखील दिवा शहरातील गणेश नगर दातिवली तलावाजवळ शेकडो महिलांनी व दिवेकरांनी तसेच शिवसैनिकांनी सहभागी होत श्री रामाची महाआरती घेतली. मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकलपनेतून एकत्र येत मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यात महाआरतीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे, दीपाली भगत, सुनीता मुंडे, साक्षी रमाकांत मढवी तसेच हजारो महिला व दिवेकर नागरिक उपस्थित होते.