ठाण्यात ऐक लाख ४२ हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार ACB च्या जाळ्यात.

0

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे ता 10 एप्रिल : ठाण्यात तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीची शेतजमीन अकृषिक जमिनीमध्ये रूपांतरित करण्याकरिता शासकीय फी व्यतिरिक्त रु. १,४२,०००/- स्वतः करिता व इतर लोकसेवकांकरिता लाचेची मागणी करून सदरची १,४२,०००/- रुपये लाचेची रक्कम आज दुपारी साडे चार वाजता श्री वासुदेव बिसन पवार, वय 57 वर्ष, निवासी नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालय, ठाणे. (वर्ग 2 ) यांनी स्विकारल्यानंतर नमुद वरील आरोपीना ठाणे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले आहे .

प्रसंगी सापळा पथकात श्री प्रमोद जाधव, पोलीस उपअधीक्षक, सहा.पो.उप.निरी/ शिंदे, पोहवा/ पवार, पोहवा/ गोसावी, मपोहवा/ जोंधळे, पोशि/ भुजबळ हे होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!