दिव्यात ठाणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलसाठी भाजपचा एल्गार !
महिला मोर्चा अध्यक्षा ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांचा आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग
ठाणे, दिवा ता 10 एप्रिल : दिव्यात महापालिकेचे सार्वजनिक रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे व येथील माता भगिनी व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी ठाणे शहर आमदार संजयजी केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज दिवा प्रभाग समिती येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी शेकडो महिला दिवा ते प्रभाग समिती कार्यालय दरम्यान मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
दिव्यात हॉस्पिटल व्हावे यासाठी दिव्यातील महिला भाजपच्या महिला अध्यक्ष ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.दिव्यात एकही पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय नाही. जोपर्यंत सुसज्ज रुग्णालय होत नाही तोपर्यंत तातडीने उपलब्ध असणाऱ्या पालिकेच्या इमारती मध्ये रुग्णालय सुरू करावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आंदोलनात दिव्यातील भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मोर्च्या अध्यक्ष ज्योती राजकांत पाटील, ठाणे शहर कार्यकारणी सदस्य विजय भोईर, संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, सरचिटणीस युवराज यादव, विश्वास भालेराव जिल्हा उपाध्यक्ष RPI, समशेर यादव, वीरेंद्र गुप्ता, मधुकर पाटील, प्रवीण पाटील, बैधनाथ पाडी, अजय सिंग, गौरीशंकर पटवा, राहुल साहू, नागेश पवार, अवधराज राजभर, अशोक सोलंकी, गयादिन यादव, संजू कनोजिया, सुहासिनी गुलेकर, साधना सिंग, विशाखा दांडेकर, सोनाली वीर, सुनिता प्रजापति, श्रेया परब, नंदा कंसार, स्नेहल राणे, पुनम पाटणकर, आशा कनोजिया, मीनाक्षी दरडे, उषा साळुंखे, रेणू यादव, जयसिंग कांबळे, कपिल रोडे, उमेश जाधव, अनुराज पाटील, कल्पेश सारस्वत व शेकडो महिला सहभागी झाले आहेत.