दिवा रेल्वे स्थानक पूर्वे तिकीटघराचे शिवसेनेकडून लोकार्पण.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 15 एप्रिल : अखेर अनेक वर्षापासून मागणी असलेले दिवा रेल्वे स्थानकाच्या पुर्व दिशेला रेल्वे तिकीटघर सुरु झाले आहे. चार पाच लाखांची लोकसंख्या असलेल्या दिवा शहरातील रेल्वे प्रवाश्याना तिकीट काढण्यासाठी दिवा स्टेशन पश्चिमेस जावे लागत असे परंतू शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुरव्यामुळे व दिव्यातील शिवसेनेचे मा.उप महपौर रमाकांत मढवी व इतर स्थानिक नगरसेवक तसेच दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या मंगणीला अखेर आज यश मिळाले आहे.मागील दोन वर्षांच्या कालावधीत दिवा रेल्वे स्थानकाचा पूर्ण कायापालट झालेला दिसून येत आहे एक्सलेटर , सुलभ सौचालय, दोन पादचारी पुल वैगरे असे बदल घडवून आणले आहेत तसेच लवकरच दिवा ते सी एस एम टी लोकल रेल्वे सेवा सुरू होईल असे प्रतिपादन शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
प्रसंगी दिवा स्टेशन पूर्व येथील नूतन तिकिट घराचे उद्घाटन शिवसेनेचे मा. महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले सदर उद्घाटन प्रसंगी रेल्वेचे पदाधिकारी व स्थानिक नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव, सुनीता गणेश मुंडे, दिपाली भगत, दर्शना म्हात्रे, तसेच रेल्वे प्रवासी संघटना चे आदेश भगत , निलेश पाटील, अर्चना पाटील, निलेश म्हात्रे, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, अरुण म्हात्रे, जेष्ठ शिवसैनिक ब्रम्हा पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते व दिवेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते