दिवा मनसे कडून लोकार्पण झालेल्या तिकीट घरा निमित्त मोफत तिकीट व पेढे वाटप.
दिवा मनसे कडून लोकार्पण झालेल्या तिकीट घरा निमित्त मोफत तिकीट व पेढे वाटप.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 15 एप्रिल : स्थानिक आमदार श्री.राजू पाटील यांच्या प्रयत्नांनंतर दिवा पूर्वेकडील नव्याने शिवसेनेने सुरू करण्यात आलेल्या तिकीट घराचे आज लोकार्पण करण्यात आले असून त्याच निमित्ताने सर्व प्रवाशांचे तोंड गोड करण्यासाठी साखऱ्या आणि पेढे तसेच मोफत तिकीट वाटप मनसे दिवा अध्यक्ष श्री.तुषार भास्कर पाटील यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह दिवावासियांना करण्यात आले. तसेच आजचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी आज दिव्यातून लोकल प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मनसे दिवा शहर तर्फे मोफत तिकीट वाटप करण्यात आले आहे.तसेच आमदार राजू पाटील यांनी सतत दोन ते तीन वर्षापासून तिकीट घरासाठी पाठपुरावा करून अखेर आज दिवेकराणा सुस्सज तिकीट घर उपलब्ध झाले या मुळे पूर्वेतील दिवेकर नागरिकांचे परिश्रम व वेळ ची बचत होणार आहे असे मनसेचे दिवा शहर प्रमुख तुषार पाटील यांनी स्पष्ट केले