उद्या चला एकविरा आईच्या दर्शनाला ; दिवेकरांना मा. महापौर रमाकांत मढवी यांच्यातर्फे मोफत एकविरा देवी दर्शन
संतोष पडवळ – प्रतिनींधी
ठाणे, दिवा ता 20 एप्रिल : दिवा शहरातील शिवसेनेचे दिवा शहरप्रमुख व मा.उप महापौर रमाकांत मढवी यांनी प्रभागातील माता भगिनींना शुक्रवार दिनांक २१ एप्रिल रोजी दिवेकरांना लोणावळ्याच्या एकविरा आईचे मोफत दर्शन सोहळ्याचे विशेष आयोजन केले असून युवा सेनेच्या साक्षी रमाकांत मढवी , मा. नगरसेविका दर्शना म्हात्रे, मा.नगरसेविका सुनीता गणेश मुंडे तसेच समाजसेविका सरिता मढवी यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा एकविरा देवी मंदिरात दिव्यातील शेकडो महिला उपस्थित राहून दर्शन घेतील.
कार्ला लेण्यांच्या मधोमध या डोंगरावर वसलेली आहे रेणुका मातेचा अवतार असलेली “एकविरा’ देवी. भारत आणि नेपाळमधल्या अनेक प्रांतात एकवीरा देवीला रेणुका मातेचा अवतार मानल्या जाते. भारतात इतरत्रसुद्धा एकविरा देवीची अनेक मंदिरे आहेत. पण हे पुरातन पांडवकालीन मंदिर असून मुंबई आणि इतर परिसरातल्या प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे आणि अनेक उपजातींचे कुलदैवत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचे सुद्धा हे कुलदैवत आहे. शेकडो भाविक हा डोंगर पायथ्यावर असलेल्या ‘पायथा’ मंदिराचे दर्शन घेऊन चढतात. या मंदिरात आई एकविरा देवीची सुरेख मूर्ती आहे.
एकविरा देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे युवा सेनेच्या साक्षी रमाकांत मढवी यांनी आवाहन केले आहे.