देसाई नाका येथील अनाधिकृत फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करा ; मनसे आक्रमक .
संतोष पडवळ – ठाणे
ठाणे, ता 24 एप्रिल : मनसे आमदार राजू पाटील यांच्या सूचनेनुसार व मनसेचे दिवा विभाग अध्यक्ष शरद पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे महापालिकेच्या हद्दीत देसाई नाका येथील अनाधिकृत फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करण्याबाबत दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांना निवेदन देण्यात आले. देसाई नाक्यांवर फेरीवाल्यांमुळे नागरिकांना व वहान चालकाना चाकरमान्यांना मोठा त्रास होत असुन, फेरीवाल्यांमुळे नेहमी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे फुटपाथ व्यापले गेले आहे. त्यामुळे नागरीकांना चालण्यास अडचण निर्माण होत असल्याने आपण गांभीर्याने लक्ष घालुन अनाधिकृत फेरीवाल्यांवर त्वरीत कारवाई करावी असे देसाई नाका येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष जयेश कोटकर यांनी निवेदनात म्हटले आहे.