डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात दिव्यात भीमसैनिक एकवटले
*संतोष पडवळ – प्रतिनिधि*
ठाणे, दिवा ता 24 एप्रिल : दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी जगदिश अरुण पवार नामक व्यक्तीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी छोटा भीम कार्टून च्या शरीराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोर्फिंग केले होते, सदर पोस्टची माहिती वाऱ्यासारखी दिवा शहरात पसरली, सदरचा इसम हा दिवा शहरात व्यवसाय करतो त्याचा दिवा शहरातील धम्म बांधव यांनी समाचार घ्यावा अशी पोस्ट टाकली होती, सदर पोस्ट बाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे प्रमुख संघटक आयु. बालाजी कदम यांनी दखल घेत दिवा शहरातील तमाम आंबेडकरी समाजाला सदरच्या प्रकरणाबाबत जागृत केले, यानंतर सदरच्या व्यक्तीला वरळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सदर व्यक्तीवर वरळी तसेच दिव्यात संतप्त भीम अनुयायी कडून निषेध व्यक्त करण्यात आला असून पोस्ट करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासंदर्भात दिव्यातील विविध संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या वतीने निवेदन दिवा पोलिस चोकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांना देण्यात आले, निवेदन देताना संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष आयु.दिनेश पाटील साहेब , उपकर्याध्यक्ष तसेच सम्यक समता मंडळ चे अध्यक्ष आयु अभिषेक जाधव साहेब, प्रमुख संघटक आयु. बालाजी कदम, रिपाई महीला दिवा अध्यक्षा शिलाताई त्रिभुवने, रीपाई आय टी सेल प्रमुख आयु सौरव अधांगळे, भीम पैंथर सेनेचे संदीप जाधव, राहुल शिंदे, सचिन जाधव, तसेच आयु.संभाजी कदम, आयु. भरत मोहिते, आयु. संजय जाधव , आयु. दिनेश पगारे आणि असंख्य भीम बांधव आणि भगिनी उपस्थित होते, महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांनी दिले आहे.