दिवा शहरातील युवासेनेचे अभिषेक ठाकूर यांची ठाकरे गटाच्या युवा अधिकारीपदी नियुक्ती..
*संतोष पडवळ – प्रतिनिधि*
ठाणे दि. २३ (प्रतिनिधी) – शिवसेना – (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण लोकसभेतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
जिल्हा युवा अधिकारी : महेंद्र म्हात्रे (अंबरनाथ, उल्हासनगर व कल्याण पूर्व विधानसभा). उपजिल्हा युवा अधिकारी : स्वप्नील पावशे ( कल्याण ग्रामीण विधानसभा), प्रथमेश गायकर (मुंब्रा-कळवा विधानसभा). विधानसभा युवा अधिकारी : सूरज जाधव ( कल्याण ग्रामीण विधानसभा), अश्विन म्हात्रे (मुंब्रा-कळवा विधानसभा). तालुका युवा अधिकारी : जयेश म्हात्रे (कल्याण ग्रामीण तालुका).
शहर युवा अधिकारी : आकाश सोनावणे (उल्हासनगर शहर), प्रसाद टुकरुल (डोंबिवली शहर पूर्व), राहुल चौधरी (डोंबिवली शहर पश्चिम), अभिषेक ठाकूर
(दिवा शहर), विनोद पाटील (मुंब्रा शहर), विक्रम गायकर (कळवा शहर). सदर नियुक्त्या चा कार्यकाळ एक वर्षासाठी असून पुढील पदाधिकारी यांचे कार्य पाहू न निर्णय घेण्यात येईल.
दिव्यातील तरुण चेहरा व संयमी नेतृत्व करणारे अभिषेक ठाकूर यांची नियुक्ती दिवा शहरातून करण्यात आली त्यामुळे अनेक युवा वर्ग आनंदात असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रसंगी मा आमदार सुभाष भोईर तसेच ठाकरे गटाचे पदाधिकारी सचिन पाटील, अंकिता पाटील, योगिता नाईक, हेमंत नाईक, यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिषेक ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.