दिवा शहरात लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 25 एप्रिल : ठाणे मनापाच्या हद्दीतील दिवा शहरात लवकरच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण होणार असून दिवा प्रभाग समितीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र दिवा शहरापासून सात किलोमीटर जावे लागत होते परंतू दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या मागणीला आता यश मिळाले असून दिव्यातील मातोश्री नगर मधील ड्यू ड्रॉप शाळेजवळ हे प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णत्वास आले आहे.
प्रसंगी दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी दिवा शहारासाठी लवकरच ठाणे महानगर पालिकेचे हॉस्पिटल होणार असून त्यासंधर्भात ठरावही पास झाल्याचे व दिव्याजवळील आगासन जवळ हे हॉस्पिटल होणार असून बाधित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळणार असून त्याबद्दल शेतकऱ्यांबरोबर चर्चा झाली असल्याचे प्रतिपादन केले आहे. त्याचप्रमाणे दिव्यात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एकूण सात सुरु असून दररोज प्रत्येकी 120 ते 130 जण त्याचा फायदा घेत असल्याचे मढवी यांनी सांगितले आहे.
प्रसंगी आज लोकार्पण होणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा व पाहणी दौरा करण्यात आला. प्रसंगी ठाणे मनपाचे आरोग्य खात्याचे अधिकारी, तसेच मा नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे तसेच शिवसेनेचे निलेश म्हात्रे, शशिकांत पाटील,चरणदास म्हात्रे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.