यशस्वी उद्योजक होण्यासाठी आत्मविश्वास आणि कष्ट महत्वाचे ; मी उद्योजक होणार कार्यशाळा उत्साहात संपन्न
मुंबई ता 28 एप्रिल (संतोष पडवळ) :
महाराष्ट्र बिजनेस फोरम, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि शिवशाहू यांच्या वतीने मी यउद्योजक होणार ही कार्यशाळा माटुंगा येथील क्षणमुखाणंद सभागृहात घेण्यात आली या कार्यशाळेत मार्केटिंग, भांडवल, स्टार्टअप् बिझनेस सहकारी योजना यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
समाजाच्या उन्नतीसाठी फक्त शेती आणि नोकरीत न अडकता उद्योजक होऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी घेण्यात आलेल्या मी उद्योजक होणार या कार्यशाळेसाठी क्षणमुखाणंद सभागृह खचा खच भरून गेले होते.
आजच्या प्रगत काळात महागाई वाढली आहे अशा वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मार्केट मध्ये टिकून राहण्यासाठी आपले उत्पन्न नाही तर आपल्या अंगी असलेले गुण अधिक बळकट करा स्वतःला मूल्यवान बनवा आणि जोमाने काम करा असा मूलमंत्र देण्यात आला.
उदयोजक होण्यासाठी सुरवातीपासून घेतलेले खडतर परिश्रम त्यामध्ये आलेले अडथळे पार करत आज उद्योजक बनेपर्यंतचा प्रवास कथन करत यशस्वी उद्योजक होण्यासाठी जिद्द महत्वाची आहे असा सल्ला आमदार प्रसाद लाड यांनी दिला.
महाराष्ट्रातील उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर छोटे छोटे उद्योग सुरू केले पाहिजेत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच मराठी उद्योजकांसाठी जे जे सहकार्य लागेल ते सरकार देईल असा मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेशही यावेळी सांगण्यात आला.
बिजनेस फोरम पुढे न्यायचा असेल तर एक समिति बनवावी येत्या काही दिवसात दुबई मध्ये १० हजार मराठी उद्योजकांची परिषद घेण्यात येणार आहे तसेच जागतिक पातळीवर मराठी माणसाला उद्योजक करण्यासाठी त्यादृष्टीने पावले उचलत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
याप्रसंगी उद्योजक सुरेश हावरे, नरेंद्र पाटील, राजश्री पाटील, कुंदन गुरव या उद्योजकांनी मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या शासकीय योजनांची जत्रा याबाबत माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्यात मुंबई आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायचं म्हटलं तर सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येत ते म्हणजे आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं. महाराष्ट्रातील अनेक तरुणांसाठी विश्वास नांगरे पाटील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. एका छोट्याशा गावातून आलेल्या विश्वास नांगरे पाटील यांनी फक्त कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांच्या या खडतर प्रवास करुन यश कसे मिळवलेलं आहे.त्यातील आपल्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.
आपण मुंबईचे मानकरी आहोत. राज्याबाहेरुन येणारे लोक मुंबईत यशस्वी उद्योजक होत आहेत.देशाच्या अर्थकारणात मुंबई ३४ टक्के योगदान देते. यामध्ये मराठ्याचे योगदान हवे असून आपण अर्थव्यवस्थेचे मानकरी झाले पाहिजे, असे प्रतिपादन सूक्ष्म,लघू,मध्यम केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांच्या हस्ते या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने देण्यात येणारा मराठा समाजासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले कै. अँड शशिकांत पवार मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार त्यांच्या कुटुंबाला देण्यात आला.
आपल्या दैनंदिन आरामदायी जीवन शैलीतून बाहेर पडून जे काम याआधी केलेले नसेल ते स्वेच्छेने स्वीकारून त्या परिस्थितीत आत्मविश्वासाने आणि कष्टाने काम केल्यास तुम्ही यशस्वी उद्योजक होऊ शकाल असा सल्ला मी उद्योजक होणार कार्यशाळेत उद्योजकांनी उपस्थितांना दिला.
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत,आमदार प्रसाद लाड, आय पी एस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, नरेंद्र पाटील, सुरेश हावरे, नीलेश मोरे, राजेंद्र सावंत, संग्राम पाटील, संतोष पाटिल, संजय यादवराव, राजश्री पाटील, उदय सावंत, प्रकाश बाविस्कर ( मराठी पाऊल पडते पुढे) व शशांक रावले उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निलेश मोरे,हेमंत मोरे, संतोष पाटील,आणि उदय सामंत यांनी मोलाचे योगदान दिले
तसेच उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी भूषण जावध, नितिन कोलगे ,अमित बागवे ,प्रकाश बाविस्कर,सुभाष बावडेकर, उमेश चव्हाण, संजय यादवराव, नामदेवराव जाधव यांचा सन्मान करण्यात आला तर दहा लाख मुलांना पौष्टिक आहार देणाऱ्या डेसिमल फाउंडेशनच्या नीलम जेठमवाणी यांना सामाजिक कार्यासाठी गौरवण्यात आले.
मी उद्योजक होणारच या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मोलाचे सहकार्य केले त्या महाराष्ट्र बिजनेस फोरम, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ आणि शिवशाहू प्रतिष्ठान संपुर्ण टीमचे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे जीवन भोसले यांनी शेवटी आभार मानले.