पाणीप्रश्न न सूटल्यास प्रभाग समितीसमोर संसार थाटू – सचिन भोईर, भाजप, दिवा.

0

संतोष पडवळ – प्रतिनिधी

ठाणे, दिवा ता 2 मे : त्या सात कुटुंबीयांना जर आठवड्याच्या आत नवीन पाणी कनेक्शन दिले नाहीत तर…. त्यांचा पूर्ण संसार दिवा प्रभाग समितीमध्ये येऊन समोर मांडू असा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री सचिन रमेश भोईर यांचे दिवा प्रभाग समिती कार्यकारी अभियंता यांना जाहीर आवाहन केले आहे.

दिवा पूर्व येथील साबे रोड परिसरातील हरे कृष्ण हरे रामा सोसायटीमध्ये नोव्हेंबर 2022 पासून पाण्याची समस्या भेडसावत आहे त्यांनी वारंवार दिवा प्रभाग समितीमध्ये ह्या संदर्भात पाठपुरवठा केला असून त्यांचे पाण्याचे कनेक्शन अधिकृत आहे व त्यांनी कोणतेही बिल सुद्धा थकीत ठेवलेले नाही पण तरीही मनपा अधिकाऱ्यांमुळे त्या सात कुटुंबियांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ह्या संदर्भात पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवी ची उत्तरे देऊन वारंवार आज कनेक्शन देतो उद्या कनेक्शन देतो असे सांगितले जाते. पण असे सांगून त्यांच्याकडे महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.. त्या कुटुंबांमध्ये मध्यमवर्गीय लोक राहतात त्यामुळे प्रत्येक दिवशी टँकरने पाणी भरणे ही त्यांना शक्य होत नाही. आणि म्हणून जर आठ दिवसांच्या आत त्यांना नवीन कनेक्शन दिले नाही आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर त्या सात कुटुंबीयांना सोबत घेऊन त्यांचा पूर्ण संसार दिवा प्रभाग समितीमध्ये मांडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

   

You may have missed

error: Content is protected !!