शाळांना सुट्टी असतानाही गैरसमज पसरवणारे राजकारण – निलेश पाटील.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 4 मे :- ठाणे महापालिकेच्या सर्व शाळांना सुट्टी असतानाही विद्यार्थी ऊन, पावसात धडे घेत असल्याचे तारे तोडणारे ठाकरे गटाचे सचिन पाटील हे फक्त प्रसिद्धीसाठी लोकांना चुकीची माहिती देत असून महापालिकेच्या शाळेचे लोकार्पण सर्व कामे पूर्ण झाल्यावर योग्य वेळी होईल असा विश्वास शिवसेनेचे निलेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दिवा शहरातील साबे गावातील महापालिकेची शाळा क्र 80 ही शाळेची इमारत ठामपा मार्फत उभारण्यात आली आहे.या इमारतीचे लोकार्पण महापालिकेमार्फत नियोजित वेळी केले जाणार आहे. ठाणे महापालिकेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार हे लोकार्पण योग्य वेळी होईल मात्र मुलांना ऊन, वारा पावसात शैक्षणिक धडे घ्यावे लागतात असे मे महिन्याच्या सुट्टीत सांगून लोकांची दिशाभूल करणारे ठाकरे गटाचे सचिन पाटील केवळ राजकारण करत असल्याचा टोला निलेश पाटील यांनी लगावला आहे. ज्यांना घराजवळील शाळेला सुट्टी आहे हे माहीत नाही ते केवळ प्रसिद्धी साठी लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.