शिक्षणासोबत शहापण गरजेचे, शिक्षण आहे म्हणून जनतेची दिशाभूल करण्याचे लायसेन्स मिळाले आहे का ? – निलेश पाटील, शिवसेना
ठाणे, दिवा ता 4 मे (संतोष पडवळ) :- लहान मुलांना उन्हात आणि पावसात बसावं लागत आहे असं खोटं सांगून स्टंटबाजी करणाऱ्या ठाकरे गटाच्या सचिन पाटील यांचा खोटारडेपणा शिवसेनेचे निलेश पाटील यांनी उघडीस आणला असता, कमी शिक्षित लोकांनी आम्हाला शिकऊ नये असा अजब आणि अहंकारी उत्तर दिल्याने शाळेच्या इमारतीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
दिवा शहरातील साबे गावातील शाळेच्या इमारतीचं काम अंतिम टप्प्यात असून येणाऱ्या शैक्षणिक वर्षात ती सुरू सुद्धा होणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन ठाकरे गटाचे सचिन पाटील यांनी लहान मुलांना उन्हात आणि पावसात बसावं लागत आहे, तरी नवीन इमारती मध्ये शाळा सुरू करावी अशी ही स्टंटबाजी केली होती. याला उत्तर देताना निलेश पाटील यांनी मुलांना सुट्टी असताना लहान मुलं शाळेत येऊन उन्हा पावसात कशी काय बसू शकतात? स्वतःच्या घराजवळ शाळा भरत असून ठाकरे गटाच्या सचिन पाटील यांना शाळेला सुट्टी हे माहिती नाही का? असा जोरदार टोला लगावला होता. यावर उत्तर देताना ठाकरे गटाच्या सचिन पाटील यांनी कमी शिक्षण झालेल्या व्यक्तींनी आम्हाला शिकवू नये असे म्हटले आहे.
शिक्षण जास्त झालं म्हणजे तुम्ही खोटं बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची का? असा संतप्त सवाल आता शिवसेनेचे निलेश पाटील यांनी केला आहे. आपले वडील ही शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचं ही शिक्षण कमी झाले आहे त्यामुळे त्यांच्याशी बोलताना आपण अशाच प्रकारे अहंकाराने बोलता का? दोन वर्षांपासून शाळेची इमारत तयार आहे असे म्हणणाऱ्या सचिन पाटील यांनी वर्षभरपूर्वी नगरसेविका असणाऱ्या आपल्या भावाच्या पत्नी विरुद्ध असा आवाज का उठवला नाही? असा सवाल केला आहे.
येणाऱ्या शैक्षणिक वर्षात शाळेची नवीन इमारत सुरू होणारच आहे हे माहिती असून सुद्धा मे महिन्याच्या सुट्टीत शाळा भरते असा अजब दावा करणाऱ्या सचिन पाटील यांचा उतावळेपणा दिवावासीयांच्या समोर आला असल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.