दिव्यातील साबेगावातील पाणी समस्येवर भाजपचे सचिन भोईर यांचा प्रभाग समितीवर मोर्चा.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 8 मे : दिवा शहरातील साबेगावातील रहिवाश्यांचा पाणीप्रश्न न सूटल्यामुळे प्रभाग समितीवर दिवा भाजपाचे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्या सात कुटुंबीयांना जर आठवड्याच्या आत नवीन पाणी कनेक्शन दिले नाही किंवा पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर त्यांचा पूर्ण संसार दिवा प्रभाग समिती समोर मांडू असे दिवा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी प्रभाग समिती कार्यकारी अभियंता यांना जाहीर आवाहन केले होते. दिवा पूर्व येथील साबे रोड परिसरातील हरे कृष्ण हरे रामा सोसायटीमध्ये नोव्हेंबर 2022 पासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यांनी वारंवार दिवा प्रभाग समितीमध्ये ह्या संदर्भात पाठपुरवठा केला असून त्यांचे पाण्याचे कनेक्शन अधिकृत आहे व कोणतेही बिल थकीत ठेवलेले नसतानाही ठाणे मनपा अधिकाऱ्यांमुळे त्या सात कुटुंबियांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. ह्या संदर्भात पाणी खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊन वारंवार आज कनेक्शन देतो उद्या कनेक्शन देतो असे सांगितले जाते. सतत सात ते आठ दिवस पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला असताना अचानक पाणी बंद केले पण असे सांगून त्यांच्याकडे महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.त्या कुटुंबियांना जर आठ दिवसांच्या आत त्यांना नवीन कनेक्शन दिले नाही आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर त्या सात कुटुंबीयांना सोबत घेऊन त्यांचा पूर्ण संसार दिवा प्रभाग समितीमध्ये मांडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन रमेश भोईर यांनी दिला आहे.दिव्यातील साबेगावातील सदर सोसायटीत गरीब व मध्यमवर्गीय लोक राहतात त्यामुळे प्रत्येक दिवशी टँकरने पाणी विकत घेणे हे त्यांना शक्य होत नाही त्यामुळे सर्व रहिवासी महिला या मोर्चात सहभागी होऊन प्रभाग समितीवर धडकल्या प्रसंगी अखेर संतापलेल्या महिलांना प्रभागसमितने सकारात्मक आश्वासन देऊन दोन चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर सुटकेचा श्वास घेतला.
प्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष सचिन रमेश भोईर, दिवा मंडळ उपाध्यक्ष निलेश भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप, भोईर युवा मोर्चा सरचिटणीस आशिष पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष सुमित मढवी, आकाश भोईर, प्रणव भोईर, प्रतिश साळुंखे