मा. उपमहापौर रमाकांत मढवी यांनी वाढदिवस रद्द करत सामाजिक उपक्रमावर भर.
*संतोष पडवळ – प्रतिनिधि*
ठाणे, दिवा ता 8 मे : ठाण्याचे मा. उपमहापौर व शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र, बंधू, हितचिंतक व सहकारी यांना विनंती पूर्वक कळविले आहे की माझे सहकारी मा.नगरसेवक दीपक जाधव यांचे सुपुत्र रौनक दीपक जाधव यांचे आकस्मित निधन झाल्याने शिवसेना दिवा शहरावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे या कारणामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कोणीही मला प्रत्यक्षात शुभेच्छा देण्यास येऊ नये तुमचे प्रेम व आशीर्वाद माझ्या सोबत आहेत असे कळवले आहे. तसेच त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांनी ठेवलेले सामाजिक उपक्रम राबवले जातील असे कळवले आहे. त्यात गणेश नगर व मातोश्री नगर शाखेत-विद्यार्थांना शालेय वस्थू वाटप, मिलिंद नगर शाखेत-गरिबांना धान्य वाटप , तीसाई नगर येथील दातिवली शाखा दिव्यांगणा मोफत साहित्य वाटप, बेडेकर नगर शाखेत विद्यार्थांना शालेय वस्तू वाटप ,वक्रतुंड नगर शाखेत -डोळे तपासणी शिबिर,
धर्मवीर नगर शाखेत मोफत आरोग्य शिबिर असे दिवा शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत नागरिकांनी सहभागी होत शिबिराचा लाभ घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे.