बेतवडे गावाजवळील अर्धवट रस्ता पूर्ण करण्यासाठी भाजपचे सहायक आयुक्तांना निवेदन
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 8 मे : दिवा शहराजवळील बेतवडे गावाजवळील रस्ता गेल्या महिनाभरपासून बेतवडे गावातील हनुमान मंदिर ते भोईर खंडोबा मंदिर पर्यंतचा रस्ता नूतनीकरणासाठी खोदण्यात आला आहे.. सदर रस्ता हा गावातील प्रमुख रस्ता असून या रस्त्यावरून लोकांची येजा चालूच असते , रस्ताच खोदकाम केल्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे , जवळपास गेले महिनाभर हा रस्ता खोदून ठेवला आहे व रस्त्याचंकाम आहेत्या स्वरूपात बंद पडलेल आहे. आज दिवा मंडळ व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर. त्याचबरोबर बेतवडे गावातील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून दिवा प्रभाग समिती सहाआयुक्त प्रीतम पाटील साहेब यांना रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करण्याबाबत निवेदन देण्यात आले. सहाय्यक आयुक्त साहेबांनी येत्या १५ तारखेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करू असं आश्वासन दिले.. सदर प्रसंगी , युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर , ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत , आणि ग्रामस्थ उपस्थित होते.