⭕️दिवा शहरात पतीपत्नीच्या भांडणात पत्नीची मैत्रिण ठार.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 17 मे : दिवा शहरात पती-पत्नीच्या भांडणात मध्ये पडलेल्या पत्नीच्या मैत्रिणीवर पतीने चाकूने हल्ला केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
तीन वर्षांपूर्वी नागेश रूपवते आणि किरण यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. परंतु कौटुंबिक वादामुळे ती मागील काही महिन्यापासून नागेश रुपवतेची पत्नी तिची मैत्रीण ज्योती रुपवते हिच्याकडे पाटील अपार्टमेंट मध्ये रहात होती. सदर घटनेच्या दिवशी पत्नी ज्योतीला भेटण्यासाठी पती नागेश आला असता त्यांच्यात वादावादी झाली प्रसंगी रागाच्या भरात नागेशने चाकूने पत्नी किरणवर वार करत असताना पत्नीची मैत्रीण ज्योती मध्ये पडल्याने तिच्या पोटावर व गळ्याला वार झाल्याने यात तिचा मृत्यू झाला तर पत्नी किरण ही गंभीर जखमी झाल्याने तिला दिव्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली असून गुन्हा क्र 531/2023 दाखल करणाऱ्यात आला असून नुसार मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवा पोलीस चौकीचे सहा. पोलीस निरीक्षक शहाजी शेळके व पोलीस कर्मचारी कारगोडे, तामोरे, कोळी, गायकवाड पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.