मुख्यमंत्री दौऱ्याच्या पूर्व संध्येला दिव्यातील मुख्य जलवाहिनीचे लिकेज दुरुस्थ करण्यास ठाणे मनपा प्रशासनाला यश.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 7 जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिवा दौऱ्याच्या पूर्व संधेला लोकार्पण होणारी 60 मी मी व्यासाची मुख्य जलवाहनीला भूमिगत भागात काही त्रुटी निर्माण झाल्याने लिकेज झाली होती परिणामी नुकत्याच तयार करण्यात आलेल्या म्हात्रे गेट जवळील दिवा-आगासन सिमेंट काँक्रिट रस्त्यावर मुख्य जलवाहिनीचे लिकेज झाल्याने अडचण निर्माण झाली होती. परिणामी प्रशासनाने ताबडतोब युद्ध पातळीवर रस्ता खोदून काम सुरु केले. प्रसंगी उप अभियंता सुरेश वाघीरे (पाणीपुरवठा विभाग), प्रशांत सोनाग्रा (नगर अभियंता) तसेच ठेकेदार चंदू खेराडे यांनी युद्ध पातळीवर काम करून तासातच पाणी पुरवठा वाहिनीचे काम पूर्ण केले व रस्ता हि डांबरीकरण करून पूर्ण केला.