दीड कोटीचे नामांकीत ब्रँडच्या बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
मुंबई, ता 9 जून : बुहन्मुंबईचे पोलीस आयुक्त श्री वेवेक फणसळकर यांनी अवैध रित्या चालणाऱ्या धंद्यांवर काठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सी. बी. कंट्रोल कक्षाकडून गोपनिय बातमीदारांमार्फत मुंबईमध्ये अवध रित्या नामांकीत ब्रँडच्या बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची माहिती काढण्यास सुरवात केली. त्या अनुषंगाने मुंबईमधील माहिम येथील रेतीबंदर परिसरात एक इसम LAKME, LOREAL, HUDA BEAUTY, MAYBELLINE या नामांकीत ब्रँडची बनावट सौंदर्यप्रसाधने विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती गोपनीय बातमीदाराकडून सी. बी. कंट्रोल कक्षास प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीवरून दि. ०७/०६/ २०२३ रोजी श्री. मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे- २ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व सी. बी. कंट्रोलच्या पोलीस पथकाने माहिम रोतीबंदर येथे सापळा रचून बनावट सौंदर्यप्रसाधनांचा साठा डिलीव्हरी करण्याकरीता आलेल्या मोटार टेम्पोची झडती घेतली असता, नामांकीत कंपन्यांचे बनावट सौंदर्यप्रसाधनाचे एकूण ४३०८ नग किंमत रु. १८,०७,८१०/- चा मुद्देमाल जप्त केला व सदर साठा विक्री करण्यासाठी आलेल्या एका इसमांस ताब्यात घेवून माहिम पोलीस ठाणे येथे कलम ४२० भा. द.वि., सह कलम ५१, ६३, ६४ कॉपीराईट अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद केला.
नमुद गुन्हयात साक्षीदारांकडून अधिक माहिती प्राप्त केली असता सदरची बनावट सौंदर्य प्रसाधने ही अटक आरोपीने नालासोपारा, जि. पालघर येथील त्याच्या स्वतःच्या गोदाम वजा कारखान्यात व वसई येथील सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्याच्या कारखान्यातून तयार करून ती महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसर, तसेच गुजरात, नवी दिल्ली, इत्यांदी राज्यामध्ये विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
कारखान्याच्या मालकास अटक करण्यात आली. गुन्हयातील दोन अटक आरोपीतांना मा. न्यायालयाने दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.