दिव्यात आगीमुळे घरातील किंमती सामान जळून खाक.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 10 जून : आज दिनांक १० जून २०२३ रोजी १६ :१२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार दिवा स्टेशन जवळ, दिवा (पुर्व) येथील जयराम पाटील यांच्या घरामधील बेडरूम मध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान १ फायर वाहन व १ रेस्क्यु वाहनासह उपस्थित होते.सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.
सदर घटनास्थळी १६:३० वाजताच्या सुमारास लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी पोचण्यापूर्वी स्थानिक लोकांनी विझविली होती. परिस्थिती नियंत्रणात आहे. सदर घटनेत बेडरूम मधील बेड, लाकडी मांडणी व कपडे इत्यादी साहित्य जळून नुकसान झाले आहे.