दिव्यात शिवसेना (ठाकरे गट ) व तहसील कार्यालय आयोजित दाखले वाटप शिबीर.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 11 जून : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व संपर्कप्रमुख कल्याण लोकसभा, मा. आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), युवासेना दिवा शहर आणि तहसीलदार कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर उत्साहात संपन्न झाले.
दिवा उपशहर प्रमुख सचिन पाटील, शहर अधिकारी युवासेना अभिषेक ठाकूर, विभागप्रमुख दातिवली गुरुनाथ नाईक आणि तहसीलदार कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन रविवार ११ जून २०२३ रोजी सुमित हॉल दिवा पूर्व येथे करण्यात आले होते.
येथील शिबिरात दाखला मिळविण्यासाठी शेकडो नागरिकांनी अर्ज केले असून .त्यांना आगामी आठ दिवसात दाखले देण्यात येणार आहेत.
सदर मोफत दाखले वाटप शिबिरामध्ये रहिवास दाखला,अधिवास दाखला (डोमेसाईल), ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखला यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कागदपत्रांची तपासणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दाखले देण्यात येणार आहेत. शाळा – कॉलेज सुरू होणार आहेत. या स्थितीत नागरिकांना वेळेवर दाखले मिळणे आवश्यक असते. त्यामुळे एकाच छताखाली विविध दाखले मिळत असल्याने दिवा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रसंगी कल्याण ग्रामीण संपर्क प्रमुख अरविंद बिरमोळे, मा. नगरसेविका अंकिता पाटील, युवानेते सुमित भोईर, उपशहर प्रमुख दिवा सचिन पाटील, शहर अधिकारी युवासेना दिवा अभिषेक ठाकूर, उपशहर संघटिका योगिता नाईक, विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, मछिंद्र लाड, राजेश भोईर, चेतन पाटील, विभाग संघटिका स्मिता जाधव, उपविभाग संघटिका विनया कदम, उपविभाग प्रमुख गुरुनाथ पाटील, सचिव युवासेना उमेश राठोड, उपशहर अधिकारी युवासेना अक्षय म्हात्रे, सोशल मीडिया समन्वयक विराज सुर्वे तसेच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षाचे सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवासैनिक, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.