दिव्यातील शाळेसमोरील दुभाजक राजकीय दबावामुळे काढला जात नाही – ठाकरे गट.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 19 जून : दिवा शहरातील चक्काजामच्या पार्श्वभूमीवर दिवा-आगासन रस्त्यालगत आर. एन. विद्यालय, गणेश नगर या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवा आगासन रस्ता सुधारणा प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या मधोमध ‘दुभाजक टाकण्यात आले आहे. परंतु आर. एन. विद्यालय या ठिकाणी टाकण्यात आलेल्या दुभाजकामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना सोडणाऱ्या वाहन चालकाला अतिशय अडचणीचे होत आहे. सदर ठिकाणी दुभाजक टाकत असताना बाजूला विद्यालय आहे याचा विचार व्हायला हावा होता. परंतु सदर ठिकाणी दुभाजक टाकल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे असे माजी आमदार सुभाष भोईर यांनी ठामपा ला दोन महिन्या पूर्वीच कळविले होते तसेच दिव्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मा. आमदार सुभाष भोईर यांनी सहाय्यक आयुक्त दिवा प्रभाग समिती व सार्वजनिक बांधकाम विभाग दिवा प्रभाग समिती यांना दुभाजक हटविण्यासाठी पत्र दिले होते. तसेच शहर वाहतूक शाखा मुंब्रा यांनी देखील दुभाजक काढण्यासंदर्भात दिवा प्रभाग समितीला पत्र दिले आहे. परंतु राजकीय दबावामुळे प्रशासनाने जाणीव पूर्वक दुभाजक काढला नाही असे स्पष्ट केले आहे