दिव्यात राजश्री शाहू महाराज १४९ वी जयंती उत्सहात साजरी.
ठाणे , दिवा ता 26 जुन (संतोष पडवळ) दिवा शहरात कोल्हापूर रहीवासी संस्था व ताराराणी फाऊंडेशन प्रणीत महीला बचत गट आयोजित १४९ वी राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिव्यातील विठ्ठल रुख्मिणी सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
अण्णासाहेब आर्थिक विकास व कौशल्य अर्थिक विकास महामंडळाकडून महीला व पुरुषांना अर्थसहाय्य कसे प्राप्त करावे याचे मार्गदर्शन श्री मिलिंद भोसले यांनी कले तर रत्नादिप फांडेशनचे ‘संस्थापक श्री दिपक मोरे यांनी मार्गदर्शन केले. ताराराणी फाउंडेशन अंतर्गत महीना बचतगटातील महिलांना जिल्हा बँकेकडून अर्थसहाय उपलब्ध करुन देणे, महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले प्रसंगी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंती निमित्त संस्थापक ताराराणी फांउडेशन व कोल्हापुर रहीवासी संस्थेचे श्री एस डी पाटील व सौ शुभांगी एस. पाटील यांच्यातर्फे ताराराणी बचत गटाच्या सर्व महिलांना माहेरचा आहेर म्हणून साडीवाटप करण्यात आले.
प्रसंगी कोल्हापुर रहीवासी संस्थेचे एस डी पाटील,अमोल रेडेकर, एकनाथ देसाई, कृष्णा पाटील, शिवाजी वापिलकर,अशोक गजरकर, संदीप पाटील, तुषार पाटील, एकनाथ देसाई यांच्यासह सर्व सभासद हजर होते तर ताराराणी फाऊंडेशनच्या अरुणा म्हसकर, मिनाक्षी शिंत्रे, साधना सावंत, काजल चाळके, माया रणवरे, विद्या पाटील आदी महीला उपस्थित होत्या.