दिव्यातील ग्लोबल इंग्लिश विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात साजरी.
ठाणे, दिवा ता 29 जून (संतोष पडवळ) : आषाढी एकादशी निमित्त दिवा शहरातील ग्लोबल इंग्लिश विद्यालयात बाल वारकऱ्यांची दिंडी काढून आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली. प्रसंगी लेझीम, ढोलताशे, व टाळमृदंगासह विठु नामाचा गजर पहावयास मिळाला.
दिंडीतील बाल वारकऱ्यांनी केलेली वेशभूषा विशेष आकर्षण होती. विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध अभंगाच्या तालावर व विठ्ठलाचा महिमा गाणाऱ्या गीतांवर शाळेतील विदयार्थ्यांनी लेझीम पथकातून संदेश दिला. दिंडी सोहळ्याचे उद्घाटन शाळेचे संख्यापक, अध्यक्ष श्री. महेंद्र दळवी सर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापीका सौ. जोत्स्ना सोमी , हास्यप्रबोधनकार श्री. संजीवन म्हात्रे सर तसेच दक्ष पोलीस टाईम्सचे संपादक किरण सावंत उपस्थित होते.
ग्लोबल इंग्लिश स्कुलच्या मैदानातून या दिंडी सोहळ्यास सुरवात होऊन दिवा चौक, दातीवली रोड मार्गे विठ्ठल रुक्मीनी चॅरिटेबल ट्रस्टच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगाच्या भेटीसाठी पालखी पोहचली. मंदिरातर्फे विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फलाहार झाला व नंतर दिंडीची सांगता करण्यात आली.