दिव्यातील आर एन शाळेसमोरील रस्ता दुभाजक हटविण्याबाबत आयुक्तांना निवेदन.
दिव्यातील आर एन शाळेसमोरील रस्ता दुभाजक हटविण्याबाबत आयुक्तांना निवेदन.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता 5 जुलै : दिवा-आगासन रोडवरील आर. एन विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या समोरील रस्ता दुभाजक असल्याने अडचण निर्माण झाली आहे. शाळा भरताना किंवा सुटते वेळी शाळेच्या बस व रिक्षा इत्यादी गाड्यांना वळण घेण्यास अडचणी येतात तसेच वाहतूक कोंडी सुद्धा होते. शाळेच्या पूर्व प्राथमिक वर्गातील ३ वर्ष ते कॉलेजपर्यंत विद्यार्थी व पालक ये-जा करतात. परिणामी काही विद्यार्थी दुभाजकावरून रस्ता ओलांडतात अशा परिस्थितीमध्ये अपघाताच्या घटना होऊ शकतात. कोणत्याही अघटीत घटना घडू नये, यासाठी शाळेच्या गेट समोरील रस्ता दुभाजक हटविण्यात यावा अशी मागणी शाळेचे श्री नरेश पवार व रेश्मा पवार यांनी केली आहे.
प्रथम मागणी करून आठ महिने होऊन देखील त्यावर पाठपुरावा होऊन RTO विभागाकडूनही रस्ता दुभाजक हटविण्याबाबत कोणतीही हरकत नसल्याची लेखी कळविण्यात आले आहे. परंतु बांधकाम विभाकडून जाणूनबुजून विलंब होत आहे. जर का एखादा अनुचित प्रकार घडल्यास यास सर्वस्वी ठाणे महानगर पालिका तसेच दिव्यातील सर्व क्षेत्रातील सर्व प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील व तसेच आंदोलन व अनुचित घटना घडल्यास त्यालाही जबाबदर प्रशासन राहील असे निवेदनात म्हटले आहे.