ठाण्यातही कंटेनरचा थरार.
ठाणे, ता 5 जुले (संतोष पडवळ) गुजरातमार्गे मुंबईला निघालेल्या रिकाम्या कंटेनरवरील कैफ नामक चालकाचा ताबा सुटल्याने तो कंटेनर दिशादर्शक पोलला जाऊन धडकल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ उड्डाणपुल येथे घडली. ही धडक इतकी जोरात होती की, दिशादर्शक पोल खाली पडला. तसेच अपघातग्रस्त कंटेनरही बंद पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
मेसर्स धनवर्षा रोडवेज ट्रान्सपोर्टचा रिकामा कंटेनर घेऊन गुजरातहून मुंबईला निघाला होता. त्या पडलेल्या पोल आणि कंटेनरमुळे त्या ठिकाणची वाहतूक एका लेनवरून धीम्या गतीने सुरू होती. तसेच रस्त्यावरती पडलेला दिशादर्शक पोल मशीनच्या सहाय्याने एका बाजूला करण्यात आला आहे. तर अपघातग्रस्त कंटेनर टॅंकही बाजूला केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.