दिव्यातील साई सृष्टी संकुलात भाडेकरूंना दुय्यम वागणूक.
ठाणे, दिवा ता 8 जुलै (संतोष पडवळ) : दिवा शहराजवळील खर्डी येथील साई सृष्टी हाईट निवासी संकुलात भाडेकरूंना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा अजब गजब प्रकार उघडकीस आला आहे. सदर निवासी संकुलात रूम मालक व भाडेकरू भेदभाव करत उच्चशिक्षित असलेल्या भाडेकरू कुटुंबाला तुच्छ वागणूक सोसायटी पदाधिकारी देत असल्याने मेटाकुटीला आलेल्या सदर उच्च शिक्षित कुटुंबाने वकिला मार्फत सोसायटीला नोटीस बजावून जाब विचारण्यात आला असता त्याच भाडेकरुला उद्धट वर्तन करून सोसायटी अध्यक्ष व इतर सभासदांकडून अपमानित करून “तुम्ही भाडेकरू सोसायटीला नोटीस पाठवणारे कोण भाडेकरू आहात सोसायटीच्या औकाती मधे रहा “असे अपशब्द वापरून सोसायटीने अपमानित केले.
सदर सोसायटीत मालक व भाडेकरू यांच्यात उच्चनीचतेचा भेदभाव करून भाडेकरूंना दुय्यम वागणूक मिळत आहे. सदर संकुलात डॉ. समीर जगताप
हे भाड्याने रहात असून पाळीव प्राण्यांच्या पेटा कायदा नुसार सर्व सुरक्षितता पाळून कुत्रा पाळत असून त्यांनाही संकुलात कुत्रा फिरवायचा नाही तर भाडेकरूंनी त्यांची चारचाकी वाहने आवारात लावू नये असा फतवा काढला आहे सदर प्रकरण सहायक दुय्यम निबंधकांना सदर प्रकरणी तक्रार गेली असून मालक व भाडेकरू हा भेदभाव करणाऱ्या संकुलातील अध्यक्ष व सभासदावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी डॉ. जगताप कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.