कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक्सप्रेसने तीन कर्मचाऱ्यांना उडवले.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, कसारा ता 8 जुले : मध्य रेल्वे मार्गावरील कसारा रेल्वे स्थानकाजवळ एक दुर्दैवा घटना घडली आहे. अचानक आलेल्या एक्सप्रेसने 3 कामगारांना धडक दिली आहे. यामध्ये 3 कामगारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मृत्यू झालेले सर्वेश कुमार हे नवनियुक्त कर्मचारी असून मुसळधार पाऊस व धुक्यामुळे मेल एक्सप्रेस आलेली समजून न आल्याने सदर आपघात घडला आहे.