दिव्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे भव्य आरोग्य शिबिर संपन्न.
दिव्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे भव्य आरोग्य शिबिर संपन्न.
प्रभागातील शेकडो महिला व नागरिकांनी नोंदवला सहभाग…
संतोष पडवळ – प्रतिनिधि
ठाणे, दिवा ता 09 जुलै : दिवा शहरातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांभरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर विभाग यांच्या सौजन्याने कॉम्प्युटर द्वारे मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया (ऑपेरेशन) मोफत करण्यात येणार आले सदर शिबिराचे आयोजक श्री.संभाजी जाधव (समाजसेवक) सौ.स्मिता संभाजी जाधव ( महिला विभाग संघटक.दिवा) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा बी. आर. नगर, दिवा येथे आयोजित करण्यात आले होते.
अँजिओप्ला्टी,बायपास, पित्ताशय, स्वादुपिंड, हर्निया, फिशर पाईलस तसेच हृदया संबंधित सर्व आजारांवर मोफत उपचार करून शस्त्रक्रिया साठी वेळ देण्यात आले. तसेच अनेक नागरिकाचे मोफत नेत्र तपासणी करून चष्मे वाटप करण्यात येत होते उपक्रमात प्रभागातील शेकडो नागरिक व महिला वर्गाने सहभाग नोंदवला प्रसंगी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहकार्य करीत होते.