दिवा मनसेच्या एक सही संतापाची उपक्रमाला दिवेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी – संतोष पडवळ
ठाणे, दिवा ता 9 जुलै : राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेल्या जनतेच्या मनातल्या संतापला वाट मोकळी करून देण्यासाठी मनसेने एक सही संतापाची या राज्यव्यापी उपक्रमाची सुरवात केली होती. मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांच्या नैतृत्वाखाली दिवा स्टेशन मार्गावर, मुंब्रादेवी कॉलोनी ऑटो स्टँड समोर या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. सदर उपक्रमाला दिव्यातील सामान्य जनतेकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला गेला. विशेषतः महिलांची संख्या यात लक्षणीय दिसून आली.
लोकांच्या मनात असलेली चीड सहीच्या माध्यमातून व्यक्त करून सर्वसामान्य जनतेने राजकारणाचा बाजार मांडणाऱ्या सत्ताधार्यांना सणसणीत चपराक लगावली असल्याचे मत शहरअध्यक्ष तुषार पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी दिवा मनसेचे सर्व पदाधिकारी,महिला सेना, विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.