दिवा स्थानकात सतर्क आरपीएफ जवानाने वाचवले वृद्धाचे प्राण
संतोष पडवळ – प्रतिनिधि
ठाणे, दिवा ता 11 जुलै – काल (१० जुलै २०२३) रोजी दिवा आर पी एफ पोलिस हवालदार कपिल तोमर हे दुपारी १.३६ च्या दरम्यान गस्त घालत असताना फलाट क्रमांक ८ वरून गरीब रथ ही एक्स्प्रेस रेल्वे गाडी संथ गतीने जात असून ज्या मध्ये एक वृद्ध व्यक्ती कोच च्या दरवाजाला लटकत असून त्यांचे दोन्ही पाय फलाट खाली ओढले जात होते हे आरपीएफ हवालदार तोमर यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले हातातील साहित्य फलाटावर फेकून सदर वृद्ध ला वाचवण्यात यशस्वी झाले.त्यांना पुढील चौकशी साठी दिवा आरपीएफ येथे आणण्यात आले असता त्यांचे नाव सुरेश यशवंत सुर्वे(सेवा निवृत्त वरिष्ठ तंत्रज्ञ) परळ वर्कशॉप मधून होते डोंबिवली येथे राहणारे होते.
आपला जीव धोक्यात घालून आरपीएफ जवान कपिल तोमर यांनी मला नवीन जीवदान दिल्याबद्दल आभार मानले तेव्हढे कमी असे स्पष्ट करत आपली कृज्ञता व्यक्त केली