दिव्यातील अनधिकृत शाळेचा अस्वच्छतेचा बोजवारा.
दिव्यातील अनधिकृत शाळेचा अस्वच्छतेचा बोजवारा
*संतोष पडवळ – प्रतिनिधि*
ठाणे, दिवा ता 13 जुले – शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांना दहा निकष लागू करण्यात आले आहेत. शाळेतील पटसंख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृहे आणि पाण्याची व्यवस्था असली पाहिजे असा दंडक निकषांमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे जर शाळांमध्ये या सुविधांचा बोजवारा असेल तर अशा शाळांबाबत माहिती घेऊन त्याबाबतच्या अहवालाची पाहणी करण्यात येईल’ असे शिक्षण अधिकारी यांनी स्पष्ट केले होते. मात्र दिव्यातील एस डी के इंग्लिश स्कुल व एस डी के किड्स या अनधिकृत शाळेत असुविधेचा असाच प्रकार समोर आला आहे.या शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही ,विद्यार्थ्यांना स्वच्छ असे स्वच्छतागृह व वर्ग नाहीत, संगणक कक्ष व इतर सुविधांचा बोजवारा उडाला आहे शाळेचे कार्यालय देखील अस्वच्छ , शाळेत विद्यार्थ्यांना तुटलेल्या अर्ध्या ड्रम च्या घाणेरड्या पाण्या मध्ये हात धुण्यासाठी ठेवलेले निदर्शनास आले या शाळेचा भांडाफोड करून दिवा भाजप चे रोशन भगत व सतीश केलशिकर यांनी ठाणे महापालिका प्रशासन व शिक्षण विभाग यांनी कठोर कारवाई करावी अशी विनंती करून पालकांना देखील सल्ला देत आपल्या पाल्याला अशा अनधिकृत व अस्वच्छतेचा बोजवारा उडालेला शाळेत टाकू नये.