⭕ ठाण्यात राज ठाकरेंनी घेतला मिसळीचा स्वाद.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणेता १९ ऑक्टो : ठाणे शहर दौरा प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे शहरातील प्रसिद्ध असलेल्या मामलेदार मिसळीचा स्वाद घेतलेला पाहावयास मिळाला
ठाकरे महाराष्ट्रातील विविध शहरांचा दौरा करत असतात. राज ठाकरेंनी ठाण्यात गेल्यानंतर मिसळ आणि पाणीपुरीचा आस्वाद घेतला. मामलेदारची मिसळ ही ठाण्यातली प्रसिद्ध मिसळ आहे. राज ठाकरेंनी शुक्रवारी ठाणे दौऱ्या दरम्यान त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह मिसळीचा आस्वाद घेतला.
ठाण्यातली मामलेदार मिसळ ही राज ठाकरेंची आवडती मिसळ आहे. राज ठाकरे ठाणे दौऱ्यात आले तर ते मामलेदार मिसळीला भेट देऊन तिथली मिसळ खातात किंवा ठाण्यात जिथे असतील तिथे पार्सल तरी मागवतात. याआधीही ठाणे दौऱ्यादरम्यान मामलेदारची मिसळ खाल्ल्याचे किस्से आहेत. आज राज ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंसह मामलेदार मिसळीचा स्वाद घेतला.