दिवा-आगासन येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांची कारवाई.

दिवा-आगासन येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांची कारवाई.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २० ऑक्टो : दि. 19/10/2024 रोजी 3 वाजेच्या सुमारास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आगासन गावाजवळील खाडीमधील बेटावर दोन इसम हातभट्टीची गावठी दारू बनवीत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर व तपास पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी तातडीने गेले असता सदर गैरप्रकार आढळून आल्याने कायदेशीर कारवाई करण्यात आली
सदर परिसराची पाहणी केली असता तेथे 3000 लिटर क्षमतेचा गावठी दारू बनविण्याचे मोठे भांडे, दारू बनवण्याची भट्टी आणि निळ्या रंगाच्या रसायन मिश्रित ५३ प्लास्टिकचे ड्रम (प्रत्येकी 180 लिटर नुसार एकूण 9540 लिटर रसायन) असा मुद्देमाल मिळून आला. तपासणी कामी एक लिटर गावठी दारू बनवण्याचे रसायन दोन पंचासमक्ष एका बाटलीमध्ये घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला असून प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये 2054/2024 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (क),(फ) अन्वये गुन्हा दाखल कारण्यात आला असून सदरची कारवाई मुंब्रा पोलीस स्टेशनचे वपोनि अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल कोळेकर, फौजदार सुभाष मोरे, पो. ना निळकंठ लोंढे, पो. शि वसीम तडवी, नितीन धायगुडे, उमाकांत गायकवाड यांनी केली असून पुढील तपास सुरु आहे.