ब्रेकिंग ; अंबरनाथमध्ये जमिनीच्या वादातून बिल्डर संजय पाटील यांची हत्या.
ब्रेकिंग ; अंबरनाथमध्ये जमिनीच्या वादातून बिल्डर संजय पाटील यांची हत्या.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, अंबरनाथ ता २३ ऑक्टो : शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे हददीतील संजय श्रीराम पाटील रा. दुर्गा देवी पाडा यांनी 19 वर्षापुर्वी अतिरिक्त एम.आय.डी.सी., अंबरनाथ पुर्व येथे शांताराम पाटील यांचेकडुन अंदाजे 5 एकर जमिन विकत घेतली होती. त्यांनतर शांताराम पाटील यांनी सदर जमिन दुसरे लोकांना विक्री केलेली असल्याने, सदर जमीनीचे मालकीवरून विलास पाटील, सुरज विलास पाटील, हर्श सुनिल पाटील रा. दुर्गादेवी पाडा, अंबरनाथ पुर्व यांचेत वाद चालु असुन, सदर जमीनीचे वादातुन दि.22/10/2024 रोजी रात्रौ 10ः00 वाजताचे सुमारास मे.प्लायर गार्डन बिल्डींग समोर, शिवमंदीर रोड, अंबरनाथ पुर्व, याठिकाणी सुरज विलास पाटील व हर्श सुनिल पाटील रा. दुर्गादेवी पाडा, अंबरनाथ पुर्व या दोघांनी संजय श्रीराम पाटील वय-52 वर्षे यांना कोणत्यातरी धारदार हत्याराने पोटावर, छातीवर, पाठीवर, उजवे बाजुस बरगटीचे खाली मारून गंभीर दुखापती करून जिवे ठार मारून पळुन गेले होते. CR No. 872/2024 BNS कलम 103(1), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.