दिव्यात घरफोडी करणाऱ्या सराईताला मुंब्रा (दिवा) पोलिसांकडून अटक.
दिव्यात घरफोडी करणाऱ्या सराईताला मुंब्रा पोलिसांकडून अटक.
दिवा पोलीसांच्या टीमचे कौतुक.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे, दिवा ता २३ ऑक्टो : मुंब्रा पोलिस स्टेशन अंतर्गत उप आयुक्त, परिमंडळ १, ठाणे, सहा. पोलीस आयुक्त कळवा विभाग, ठाणे, वपोनि. अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा येथील साबेगाव येथे घरफोडी करणा-या आरोपीस दिवा येथील गुन्हे प्रकटीकरण अधिकारी वसंत खतेले व त्यांच्या टीमने गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषन करून शिताफीने अटक केली असता त्याचेकडुन घरफोडी करून चोरी कलेले १ लाख रु रोख रक्कम व २,१९०००, किमतीचे सोन्याचे दागीने असा एकूण ३ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदर अटक आरोपी सुजितकुमार श्यामचंद्र प्रजापती, वय २२ वर्षे, राह. आई एकवीरा अपार्टमेंट, रूम नंबर ५१२. डी. जे. कॉम्लेक्स, साबेगाव, दिवा पुर्व ता. जि. ठाणे मुळगाव- शेखपुर, पो. कल्ापुर, जोनपुर राज्य उत्तरप्रदेश नमुद आरोपीत यांचेकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व उघड करण्यात आलेले दोन गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. सदरची उल्लेखनिय कारवाई सुभाष बुरसे, पोलीस उप आयुक्त, उत्तम कोळेकर, सहा. पोलीस आयुक्त, कळवा यांचे मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस स्टेशनचे वपोनि अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय दवणे, नितीन पगार, राजु पाचोरकर, सपोनि वसंत खतेले, सहापोउनि / मोरे, पोह मुंढे, पोना.जयेश तामोरे, पोना. निलकंठ लोंढे, पोशि. उमेश गायकवाड, पोशि. महेश जाधव, पोशि. समाधान जाधव, यांनी केले असून पुढील तपास सुरु आहे.