ठाणे महापालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत स्वच्छतेची शपथ.
ठाणे महापालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत स्वच्छतेची शपथ.
संतोष पडवळ – प्रतिनिधी
ठाणे ता २५ ऑक्टो : ठाणे महापालिकेच्या वतीने शुक्रवारी सकाळी वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे आणि आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्या उपस्थितीत याप्रसंगी स्वच्छतेची शपथही घेण्यात आली.
सदर स्वछता मोहिमेची सुरूवात रस्ता क्रमांक २२ वरील सर्कल पासून झाली. त्यानंतर, परब वाडी, कशिश पार्क, मॉडेला मिल चेक नाका, शिवाजी नगर, किसन नगर एक, दोन आणि तीन, पडवळ नगर, रस्ता क्रमांक १६, शिवटेकडी, श्रीनगर, शांती नगर, कैलास नगर, आय. टी. आय. या परिसरात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली.