दिवा शिवसैनिक धनुष्यबाणासोबत – रमाकांत मढवी, शहरप्रमुख.
दिवा शिवसैनिक धनुष्यबाणासोबत – रमाकांत मढवी, शहरप्रमुख.
एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी काम करणार.
ठाणे, दिवा ता २ नोव्हे : शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यामुळे दिवा शहरातील सर्व नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. सदर नाराजी वेगवेगळ्या समाज माध्यमांसमोर जाहीरपणे मांडली जात होती. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी रमाकांत मढवी यांची मध्यरात्री भेट घेतली व जोपर्यंत भूमिका स्पष्ट केली जात नाही तोपर्यंत इथून जाणार नाही अशी ठाम भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी घेतली होती. प्रसंगी रमाकांत मढवी यांनी आपण पुढील चार दिवसात आपली भूमिका स्पष्ट करू व तोपर्यंत मी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणार नाही असं आश्वासन उपस्थित कार्यकर्त्यांना दिलं होतं.
दिवा शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, महिला कार्यकर्ते, युवासेना व शिवसैनिक यांनी दिवा पूर्व येथील नरहरी समाज मंदिर येथे आज हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून तोबा गर्दी केली होती. या बैठकीत उपस्थित सर्व महिला कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील नाराजी व रोष यावेळी व्यक्त केला तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी रमाकांत मढवी जे ठरवतील तीच भूमिका घेण्याचे जाहीर केले. यावेळी सर्व उपस्थित शिवसैनिकांशी बोलताना शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी मा. एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल मला पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे आपण निश्चित नाराज असाल परंतु आपल्याला धनुष्यबाणासाठी काम करावं लागेल असे सांगितले. प्रसंगी मा. नगरसेवक अमर पाटील, दीपक जाधव, दिपाली भगत, सुनीता मुंडे, दर्शना म्हात्रे तसेच अँड.आदेश भगत, गणेश मुंडे, उमेश भगत, चरणदास म्हात्रे, शशिकांत पाटील, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, भालचंद्र भगत, अरुण म्हात्रे, राजेश पाटील, विनोद मढवी, सचिन चौबे व सर्व उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, युवती सेना, महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.